पित्त दोष ....Acidity
पित्ताचा त्रास होत नाही असा माणूस विरळाच. आपली बदलत चाललेली जीवन पद्धती, वाढलेले मानसिक ताण-तणाव, बदललेल्या झोपेच्या वेळा, फ़ास्ट फ़ूड इत्यादी कारणाने एसिडिटी म्हणजे पित्त होत असते. हे आपण ओढवून घेतलेले दुखणे आहे. मळमळणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, जळजळणे, उत्साह न राहणे हे त्याचेच परिणाम असू शकतात. या एसिडिटीला कारण म्हणजे हार्मोन्स. गॅस्ट्रिन, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन्स पोटातील आम्ल उत्पादनावर आणि आम्ल रिफ्लक्सच्या धोक्यावर परिणाम करू शकतात .
गॅस्ट्रिन हा पचनसंस्थेतील एक संप्रेरक म्हणजे हार्मोन जो पोटाला गॅस्ट्रिक आम्ल सोडण्यास सांगतो. त्या गॅस्ट्रिनची पातळी जास्त असल्यास पोटातील आम्ल जास्त प्रमाणात येऊ शकते.
इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे खालच्या अन्ननलिका स्फिंक्टर (LES) नियंत्रित करणाऱ्या स्नायूंना आराम देणारे संप्रेरक (महिलांमध्ये आढळते). यामुळे पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत जाऊ शकते.
इतर हार्मोन्स जसे की कोलेसिस्टोकिनिन, सेक्रेटिन, न्यूरोटेन्सिन आणि ग्लुकागॉनसारखे पेप्टाइड हे हार्मोन्स आहेत जे आम्ल स्राव रोखतात. अल्डोस्टेरॉन, अँजिओटेन्सिन II, एंडोथेलिन_1, पॅराथायरॉइड संप्रेरक (PTH), ग्लुकोकोर्टिकोइड्स आणि ग्रोथ हार्मोन शरीराची आम्ल भार हाताळण्याची क्षमता वाढवू शकतात.
एसिडीटी च्या त्रासावर डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच हितकारक आहे. संगीत हे आपल्याला कम्फर्ट (comfort) झोन मधे ठेवण्यासाठी उपयोगी पडते. कारण डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतली तरी ती काही जादूची कांडी नसते की औषध घेतल आणि क्षणात बर वाटायला लागल. काही काळ जावा लागतो ना. या वेळेत जर संगीत ऐकले तर आपला मानसिक तणाव कमी होतो आणि हार्मोन पातळी योग्य होण्यास मदत होते. त्याचा परिणाम आपला त्रास कमी होण्यात होतो.
पण गाणी/ संगीत ऐकताना शांत राहणे आणि दीर्घ श्वसन करणे गरजेची आहे. कारण गाणे / संगीत हे नुस्त ऐकायचं नाहीय तर ते अनुभवायचं आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की नळ गळतो तास रेडिओ / मोबाईल/ टीवी वर गाण गळत (चालू) असत आणि आपण इतर कामे करत ऐकू येईल तसे/ तेवढे ऐकत असतो. यात गाण्याकडे लक्ष्य असेलच असे नाही. यामधे फक्त टाईमपास होतो, दुसर काहीही हाती लागत नाही. म्हणून तुम्हाला इष्ट परिणाम हवा असेल तर, गाण / संगीत हे वेळ देऊन करायची गोष्ट आहे. इतरांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी सुद्धा गाण ऐकल जात. याला काहीही अर्थ नाही. खरतर गाण अर्थासह समजून ऐकण्यात मजा आहे, ती मजा मन लाउन गाण ऐकल तरच येते. अस झाल तरच नवरसाचा आनंद मिळू शकतो. मन लावून ऐकल्यास गाण / संगीत आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जात.
खाली काही गाणी लिंकसह दिलीत. ती ऐकून बघा. तुम्ही सुद्धा इंटरनेटवर या रागातील गाणी शोधून पहा. आपण ही इतरांना सांगू आणि सर्व जण आनंदी रहायचा प्रयत्न करू. एक मात्र करा, गाण ऐकताना शांत राहणे आणि दीर्घ श्वसन करणे.
राग पुरिया धनश्री रागातील गाणी एसिडीटी च्या त्रासात आनंद देतात.
मराठी गाणी
राग मारवा सुद्धा एसिडीटी चा त्रास सहन करण्याची ऊर्जा देतो.
हिंदी गाणी
राग पुरिया धनश्री (हिंदी गाणी)
राग मारवा (हिंदी गाणी )
- सांज भई घर आजा रे (लता मंगेशकर )
- पायलिया बावरी बाजे फिल्म - साज और आवाज (बासरीवर )
- सांज ढले गगन तले (Suresh Wadkar)
- पायलिया बावरी बाजे फिल्म - साज और आवाज -लता मंगेशकर
- तुमने क्या क्या काय हमारे
- साथी रे भूल ना जाना मेरा प्यार(Asha Bhosale- Film - Kotwalsaab)
आपण अनुभव घ्यावा तसेच कमेंट मधे आपला अभिप्राय नोंदवावा म्हणजे अशी माहिती देण्यास अधिक उत्साह येईल. पुढचा ब्लॉग डायबेटीस आणि संगीत यावर असेल.
Acidity
A person who does not suffer from acidity is not usually seen as acidity issue is very common. Acidity is caused by our changing lifestyle, increased mental stress, changed sleep times, fast food, etc. Nausea, headache, feeling uncomfortable, burning, lack of enthusiasm can be the result of this acidity, hormones are the cause of this acidity. Hormones like gastrin, estrogen and progesterone can affect stomach acid production and the risk of acid reflux.
Gastrin is a hormone in the digestive system that tells the stomach to release gastric acid. If gastrin levels are high, stomach acid can come in high amounts.
Estrogen and progesterone are the muscle relaxing hormones that control the lower esophageal sphincter (LES) (found in women). This can cause stomach acid to return to the esophagus.
Other hormones such as cholecystokinin, secretin, neurotensin, and peptides like glucagon are hormones that inhibit acid secretion. Aldosterone, angiotensin II, endothelin_1, parathyroid hormone (PTH), glucocorticoids, and growth hormone can increase the body's ability to handle acid loads.
It is always beneficial to consult a doctor on acidity problems. Music helps to keep you in a comfort zone. Because even if you take medicines on the advice of a doctor, it is not a magic wand that you take the medicine and feel better in an instant. It takes some time. Listening to music during this time can reduce your mental stress and help get hormone levels right. It results in reducing your suffering.
But it is important to stay calm and take a deep breath while listening to songs/music. Because the song / music is not just to be heard, but to be experienced. A lot of times we see the people switch on the radio/mobile/TV like a water tap and do not bother to be attentive and continue other work. It just passes the time. Nothing else. So singing / music is something to do with devoting proper time, if you want the desired effect.
Here are some of the songs with links. Listen to it. You can also search the internet. We will also tell others and try to make everyone happy. Rememebr to have deep breathing meanwhile
Rag Puriya Dhanashree
Raag Marava (Marathi Songs)
Rag Puriya Dhanshree
Rag Marva
- Payeliya Banvari (a.k.a. Na Phulon Ki Duniya)
- Film - Saaz Aur Aawaz on Flute Payeliya Banvari (a.k.a. Na Phulon Ki Duniya)
- Film - Saaz Aur Aawaz Lata Mangeshkar
- Sanj Bahi Ghar aaja re (Lata Mangeshkar)
- Tumne Kya Kya kiya Hamare Liye
- Sathi Re bhool na jana mera pyar (Asha Bhosale) kotwalsaab)
- Sanj Dhale Gagan Tale
- Sanj Dhale Gagan Tale (Suresh Wadkar)
Very nice! Love your blog! A simple and easy way to improve life.
उत्तर द्याहटवाThanks for your feedback
हटवाहा वेगळाच प्रयोग करताय सर गीत संगीत आणी राग याचा आपल्या जीवनावर अवश्य परिणाम होतोच म्हणूनच संगीत कलेत। वेगवेगळे राग वेगवेगळ्या वेळेत गाण्यासाठी सांगीतले जाते कुणीही कितीही नाही म्हणाले तरी निर्सगसंगीत का होईना माणसाच्या जीवनात वेगवेगळ्या क्रीया घडवतोच हे सत्य आहे आपल्या या प्रयोगासाठी सलाम
उत्तर द्याहटवाThanks for your feedback. I agree with you 👍
हटवा