उच्च रक्तदाब (High BP) आणि संगीत
उच्च रक्तदाब (High BP) म्हणजे जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांमधील दाब हा गरजेपेक्षा खूप जास्त असतो. हे ठराविक मर्यादेत सामान्य आहे पण उपचार न केल्यास ते गंभीर होऊ शकते. साधारणत: ह्या उच्च रक्तदाबाची कारणे म्हणजे, जास्त वजन किंवा लठ्ठपणा असणे, शारीरिकदृष्ट्या एक्टिव/ सक्रिय नसणे, जास्त मीठयुक्त आहार, जास्त दारू पिणे, वाढत वय (५०-६० नंतर), अनुवंशिकता अथवा धूम्रपान करणे किंवा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करणे.
ह्यात महत्वाचं म्हणजे हार्मोनल असंतुलनामुळे उच्च रक्तदाब (BP) लक्षणीयरीत्या प्रभावित होऊ शकतो, विशेषतः जेव्हा अधिवृक्क ग्रंथी (या किडनीच्या वरील ठिकाणी असतात) (adrenal glands) जास्त प्रमाणात अल्डोस्टेरॉन हार्मोन तयार करतात, जो रक्तातील सोडियम पातळी नियंत्रित करण्यासाठी जबाबदार संप्रेरक आहे, ज्यामुळे प्राथमिक अल्डोस्टेरोनिझम नावाची स्थिती निर्माण होते ज्यात अल्डोस्टेरॉन हार्मोन गरजेपेक्षा जास्त तयार होतात. यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो तसेच थायरॉईडचे बिघडलेले कार्य आणि तणाव - संप्रेरक यांसारखे इतर हार्मोनल घटक देखील उच्च रक्तदाबाला कारण ठरतात.
मुख्य तणाव - संप्रेरके म्हणजे कॉर्टिसोल, एपिनेफ्रिन आणि नॉरपेनेफ्रिन. जेव्हा शरीराला धोका (भीती) जाणवतो तेव्हा हे हार्मोन्स सोडले जातात, ज्यामुळे शरीराची "लढाई करा किंवा पळून जा" अशी प्रतिक्रिया निर्माण होते.
अशावेळी संगीत आपला रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
संगीतामुळे आपल्या शरीरावर खालील परिणाम होतात :
• संगीत (Stress) तणाव - संप्रेरक कमी करते: संगीतामुळे कॉर्टिसोल सारख्या तणाव संप्रेरकांचे प्रमाण कमी होऊ शकते.
• हृदय गती कमी करते: संगीत हृदयाचे ठोके कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
• झोप सुधारते : उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये संगीत थेरपी झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.
या उच्च रक्तदाबासाठी भारतीय संगीतातील राग तोडी आणि राग अहिर भैरव आपणास मदत करू शकतात. काही अभ्यासांमध्ये तोडी आणि राग अहिर भैरव संगीत ऐकल्यानंतर रक्तदाबाच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे.
राग तोडी हा थोडा शोकग्रस्त असा मूड असणारा राग आहे असे म्हणतात मग हा रक्तदाबावर का उपयोगी ठरतो? 'कशी नशीबानं थट्टा आज मांडली' सारख गाण राग तोडी मधे येते. मग अस गाण रक्तदाब नियंत्रित करेल? तर उत्तर आहे हो, करेल. कारण मुळात संगीत हे नेहमीच आल्हाद दायक म्हणजे आनंद देणारे आहे, जरी गीत रचने मधे शोक असला तरी. कोणताही गायक अगदी रडक गाण सुद्धा प्रसन्न मूड असल्याशिवाय म्हणू शकत नाही. सिनेमात दाखवताना तो प्रसंग शोकग्रस्त किंवा रडका दाखवत असले तरी रेकॉर्डिंगचे वेळेस गायक आणि सोबतचे संगीत साथीदार हे प्रसन्न मूड मधे असले तरच गाण छान होऊ शकते. बऱ्यापैकी गाण म्हणणाऱ्या आपल्या कोणत्याही मित्र - मैत्रिणीला हे विचारून बघा की मूड नसेल तर गाता येत का? आपण स्वत: पण ट्राय करून बघा की मूड नसताना आपण गाणे म्हणू शकतो का? नाही हेच उत्तर आहे. तसेच ऐकण्याचे आहे. गाण्याने आपला मूड बदलतो. आपण मूड मधे असतो म्हणूनच गाणी ऐकतो. आणि संथ लयी मधली तोडी किंवा अहिर भैरवी रागातील गाणी ही रक्तदाब म्हणूनच नियत्रित करू शकतात. आनंद देऊ शकतात.
खालील मराठी गाणी ट्राय करून बघा. एक मात्र करा की गाणी ऐकताना (शक्य झाल्यास डोळे मिटून) दीर्घ श्वसन चालू ठेवा.
राग तोडी (खालील गाण्यावर क्लिक करा)
राग अहिर भैरव
आपण ही हिंदी गाणी ट्राय करून बघू शकता
राग तोडी
राग तोडी (चिराग कट्टी) (Instrumental )
राग अहिर भैरव
आपण अनुभव घ्यावा तसेच कमेंट मधे आपला अभिप्राय नोंदवावा म्हणजे अशी माहिती देण्यास अधिक उत्साह येईल. पुढचा ब्लॉग (Acidity) पित्त दोष आणि संगीत यावर असेल.😊
High BP and Music
High blood pressure is when the pressure in your blood vessels is much higher than necessary. It's common to a certain extent but can become serious if left untreated. Generally, the causes of this high blood pressure are: being overweight or obese, not being physically active, eating a high salt diet, drinking too much alcohol, old age (after 50-60), genetics or smoking, or using tobacco products.
More importantly, hormonal imbalances can significantly affect high blood pressure (BP), especially when the adrenal glands produce too much aldosterone, which is the hormone responsible for controlling sodium levels in the blood, leading to a condition called primary aldosteronism that can lead to high blood pressure, as well as impaired thyroid function and other hormonal factors such as stress hormones. The main stress hormones are cortisol, epinephrine and norepinephrine. These hormones are released when the body feels threatened, triggering the body's "fight or run away" reaction.
Music can help control your blood pressure at this time:
1. Music reduces stress: Music can reduce the amount of stress hormones, such as cortisol.
2. Music slows down heart rate: Music can help lower the heart rate, which can help control blood pressure.
3. Music improves sleep: Music therapy can improve sleep quality in people with high blood pressure.
Raag Todi and Raag Ahir Bhairav in Indian music can help you with this high blood pressure. Some studies have shown a significant reduction in blood pressure levels after listening to Todi and Raag Ahir Bhairav. It is said that Todi is a raga with a slightly sad mood, so why is it useful on blood pressure? A marathi song from Pinjara cinema like "Kashi nashiban thatta aaj mandali" comes in the rag. And will such a sad song control blood pressure? So the answer is yes, it will.
Basically, music is always pleasant, even if the lyrics are sad. No singer can sing sad song without being in a happy mood. While the scene may be mournful or crying when shown in the film, the song can only be good if the singer and the music partners are in a happy mood. Ask any of your friends who sing a lot, can you sing if you're not in the mood? The answer is no. It's also about listening. We listen to songs because we are in the mood. And songs in slow rhythmic todi or Ahir Bhairavi ragas can also control blood pressure. They can bring joy. Try the following Marathi songs Raag Todi Raag Ahir Bhairav
Try these Marathi songs
Raag Todi
Raag Ahir Bhairav
We can also try these Hindi songs
Rag Todi
Raag Todi (Chirag Katti) (Instrumental )
Next blog will be on Acidity and Music. Please give your comments / suggestions.
Thanks, 😊
Anilji, you are doing a great job. The weekly post is very nice. Thank you.
उत्तर द्याहटवाThanks for inspiring words
हटवाBest information Sir
उत्तर द्याहटवाThanks for sharing