Sunstroke (उष्मा घात/ उष्मा विकार)
पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. आपण निसर्गाची हानी केल्याने हे होते इ. इ. आपण ही चर्चा ऐकतो. आता तर उन्हाळा वाढतच चाललाय. उष्माघात, ज्याला सनस्ट्रोक (sunstroke) किंवा हीट स्ट्रोक (Heat Stroke) असेही म्हणतात, ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे जी शरीराचे तापमान 40°C (104°F) पेक्षा जास्त वाढल्यास होते. आपण घरात एसी/ कूलर/ पंखे/ पडदे लाऊ शकतो. बाहेरचे तापमान कमी करणे वैयक्तिक आपल्या हातात नसते. आणि उष्माघात या उच्च तापमानामुळे होतात.
उष्माघाताची कारणे म्हणजे जास्त उन्हात किंवा गरम हवामानामध्ये जास्त वेळ राहिल्याने शरीराचे तापमान वाढू शकते. गरम हवामानात जास्त शारीरिक काम केल्यानेही उष्माघात होऊ शकतो. शरीरात पुरेसे पाणी नसेल, तर उष्णतेमुळे होणारा त्रास अधिक वाढू शकतो.
उष्माघाताची लक्षणे: शरीराचे तापमान वाढणे: 40°C (104°F) पेक्षा जास्त, त्वचा गरम आणि लाल होणे, डोकेदुखी, चक्कर येणे आणि गोंधळ , तोंड कोरडे होणे , उलट्या आणि मळमळ, नैसर्गिकरित्या घाम न येणे, हळूहळू बेशुद्ध होणे .
उष्माघातावर उपाय:
थंड ठिकाणी जा: उष्माघाताने ग्रासलेल्या व्यक्तीला लगेच थंड ठिकाणी घेऊन जा.
शरीराचे तापमान कमी करा: थंड पाण्याने अंघोळ करा किंवा थंड कपड्याने शरीर पुसा. पाणी प्या: व्यक्तीला थंड पाणी प्यायला द्या. गरम कपडे काढून टाका. नैसर्गिकरित्या घाम येण्यासाठी मदत करा: पंख्याने वारा घाला. जर लक्षणे गंभीर असतील तर तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा .
उष्माघात टाळण्यासाठी:
जास्त वेळ उन्हात राहू नका: शक्य झाल्यास उन्हात जाणे टाळा, भरपूर पाणी प्या: शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. सैल शक्यतो पांढरे कॉटन कपडे घाला, गरम हवामानामध्ये जास्त शारीरिक काम करू नका. आवश्यक असेल तरच करा आणि करताना टाइम ब्रेक घेऊन करा.. उन्हात फिरताना योग्य सैल कपडे आणि टोपी वापरा .
मग उन्हाळ्यात घरात बसून दुपारी शांतपणे कोणती गाणी ऐकाल म्हणजे उन्हाळ्याचा त्रास कमी वाटेल? किंवा उन्हाळ्यामुळे अस्वस्थ होणार नाही? शक्य झाले तर राग मल्हार, राग शिवरंजनी किंवा राग अमृतवर्षिणी यातील गाणी इंटरनेट वर शोधा आणि शांतपणे दीर्घ श्वसन करत ऐका. उन्हाळा सहन करण्यासाठी दुपारी मस्त दीर्घ श्वसन करत ही गाणी ऐका. (गाण्यावर क्लिक केल्यावर गाणे सुरू होईल)
राग मल्हार
राग शिवरंजनी
राग अमृतवर्षिणी 
Heat stroke, also known as sunstroke or heat stroke, is a serious health problem that occurs when the body temperature rises above 40°C (104°F). The causes of heat stroke are that staying in too much sun or hot weather for too long can cause body temperature to rise. Too much physical activity in hot weather can also lead to heat stroke. If there is not enough water in the body, the problem caused by heat can increase further.
Symptoms of heat stroke:
Body temperature increases above 40 °C (104 °F), skin hot and red, headache, dizziness and confusion , dry mouth, vomiting and nausea, not sweating naturally, gradual fainting.
Remedies for heat stroke:
Go to a cool place: Take a person suffering from heat stroke to a cool place immediately.
Lower body temperature: Take a bath with cold water or wipe the body with a cold cloth.
Drink water: Let the person drink cold water. Remove your warm clothes.
Help sweat naturally: Wind up with a fan.
If symptoms are severe then contact the doctor immediately. To prevent heat stroke: Don't stay in the sun for too long: Avoid going out in the sun if possible, drink plenty of water: Don't let the body run out of water. Wear loose preferably white cotton clothing, don't do too much physical work in hot weather. Do it only if necessary and do it with a time break while doing it.. While walking in the sun use proper loose clothes and cap.
So what songs will you listen in the summer? If possible, look for songs from Raag Malhar, Raag Shivranjani or Raag Amritvarshini and listen quietly with deep breath. Listen to these songs while taking a deep breath in the afternoon to endure the summer.
(The song will begin when you click on the song)
Raag Malhar (Marathi Songs)
Raag Shivaranjani
Raag Amrutvarshini
Blog posted on most appropriate time, summer is almost here and anyone suffering from heatstroke will be benefitted by this. Thank you.
उत्तर द्याहटवाThanks sirji
हटवाVery nice sir😊keep it up👍
उत्तर द्याहटवाThanks
हटवा