Diabetes (मधुमेह)
अंदाजे १० ते १२ % लोकांना मधुमेह म्हणजे जगातील जवळ जवळ ८० कोटी लोकांना डायबेटीस हा आजार आहे. ज्यांना हा आजार आहे त्यांनी वाढू नये म्हणून आणि ज्यांना हा आजार नाही त्यांनी या पुढे होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. काळजी काय घ्याल तर स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा. कोणतही वाईट व्यसन करू नका. स्ट्रेस टाळू नका पण त्यातून बाहेर पडायचच हे मनाशी ठरवा. आनंद द्या व घ्या. साधा हलका आहार ठेवा. गोड-धोड खावा पण डायबिटीस असणारांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने खावा . अति सर्वत्र वर्ज्यते हे ध्यानात ठेवा. दररोज सातत्याने व्यायाम (एक्सर्साइज़) / चालणे ठेवा.
स्वादुपिंड (पॅनक्रियाज), थायरॉईड, अधिवृक्क ग्रंथी (एड्रेनल ग्लँड्स) आणि पिट्यूटरी ग्रंथींमध्ये हार्मोनल असंतुलन झाल्यामुळे मधुमेह होऊ शकतो . वयानुसार होणारे हार्मोनल बदल रक्तातील साखरेच्या पातळीवर देखील परिणाम करू शकतात.
हार्मोन्स मधुमेहावर कसा परिणाम करतात?
- इन्सुलिन: स्वादुपिंड (पॅनक्रियाज) इन्सुलिन तयार करते, जे रक्तातून साखर पेशींमध्ये हलविण्यास मदत करते. टाइप १ मधुमेहात, रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील इन्सुलिन स्राव करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. टाइप २ मधुमेहात, शरीर इन्सुलिनला प्रतिरोधक बनते.
- सेक्स हार्मोन्स: सेक्स हार्मोन्सचे असंतुलन टाइप २ मधुमेहावर परिणाम करू शकते. उदाहरणार्थ, महिलांमध्ये हायपरएन्ड्रोजेनिझम आणि पुरुषांमध्ये हायपोगोनॅडिझम हे जोखीम घटक आहेत.
- ताण संप्रेरके (स्ट्रेस हार्मोन्स): अॅड्रेनालाईन (एपिनेफ्रिन), कॉर्टिसोल आणि ग्रोथ हार्मोन या सर्वांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
तात्पर्य काय तर मधुमेह हार्मोनल असंतुलनामुळे होणारा आजार आहे आणि म्हणून हार्मोनल असंतुलनाला संतुलित ठेवणेसाठी योग्य आहार घ्या, नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रित करा, रक्तातील साखरेच्या पातळीचा मागोवा ठेवा. आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे कोणतेही सांगोवांगी उपचार, ऐकीव उपचार, जडीबुटी या नादाला न लागता तज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या आणि योग्य उपचार चालू ठेवा. हे महत्वाचे आहे कारण वरील इतर उपचारामध्ये डायबिटीस सोबत असणाऱ्या आजारांचा उदा: बीपी, सांधे-दुखी, मणक्याचे आजार इत्यादी आजार यांचा विचार नसतो, त्यामुळे डायबिटीस वरचा इलाज हा कदाचित इतर आजारांसाठी घातक असू शकतो. तज्ञ डॉक्टर या सर्वांचा विचार करून उपचार करतात. म्हणून तज्ञास पर्याय नाही.
संगीताच्या विश्वात राहण्याने आपण आनंदी राहतो आणि आपली स्ट्रेस हार्मोन्स पातळी खाली येऊन आपला त्रास हा निश्चित कमी होतो. म्हणून संगीत ऐका. संगीताचा शरीरावर सकारात्मक परिणाम होत असतो, हे अभ्यासाने सिद्ध झाले आहे. खाली दिलेला बार चार्ट पहा.
शरीरावर संगीताचा काय परिणाम होतो याचा अभ्यासपूर्ण बार चार्ट वर दिला आहे
अशा परिस्थितीत मधुमेह असणारांनी (किंवा होऊ नये असे वाटणारानी) कोणत संगीत ऐकाव? अभ्यासांती काही भारतीय संगीतातील राग मधुमेह कमी करणेसाठी मदत करू शकतात असे लक्षात येते. खाली काही गाणी दिली आहेत. ती ऐका किंवा इंटरनेट वर स्वत: सर्च करून दिलेल्या रागातील गाणी शोधून ऐका. आपला अनुभव शेयर करा. इतरानाही त्याचा फायदा करून द्या. आणि कोणत्याही चिंतां बद्दल विचार करत बसण्यापेक्षा तज्ञ डॉक्टरांशी बोला.
खाली काही गाणी हिंदी / मराठीत आहेत ती ऐका. ऐकताना दीर्घ श्वसन करा, अनुलोम-विलोम करा आणि शांतपणे गाणी ऐका. लक्षात ठेवा उपचारासाठी संगीत हे वेळ देऊन करायची गोष्ट आहे. मी मागच्या ब्लॉगमध्येही हे नमूद केले होते की संगीत ही जाता जाता करायची गोष्ट नाही. म्हणून स्वत:ला संगीत ऐकण्यासाठी वेळ द्या. कानावर पडणे म्हणजे ऐकणे नव्हे. लक्ष देऊन गाण अर्थपूर्ण आणि मनापासून ऐका. शब्द, स्वर, संगीतसाथ याचा अनुभव घ्या.
राग बागेश्री, राग शुद्ध कल्याण मधली आणि राग चंद्रकंस मधली ही गाणी ऐका.
राग बागेश्री (हिंदी गाणी)
राग शुद्ध कल्याण (हिंदी गाणी)
खाली काही मराठीतली काही गाणी तसेच शास्त्रीय संगीत याच्या लिंक्स दिलाय आहेत. दीर्घ श्वसन करत ती गाणी ऐका.
राग बागेश्री
राग शुद्ध कल्याण
आपण अनुभव घ्यावा तसेच कमेंट मधे आपला अभिप्राय नोंदवावा म्हणजे अशी माहिती देण्यास अधिक उत्साह येईल. तसेच आपल्या आप्त जनांस मित्र परिवारास हा ब्लॉग सुचवावा व त्यांचं आनंद वाढवावा. पुढचा ब्लॉग उष्माघात / उष्मा विकार आणि संगीत यावर असेल.
References:
- https://ihpi.umich.edu/news-events/news/music-may-bring-health-benefits-older-adults-poll-suggests
- https://medicalxpress.com/news/2024-03-music-therapy-impact-chronic-pain.html#google_vignette
- https://www.medindia.net/health/lifestyle/raga-therapy-for-healing-mind-and-body-healing-ragas.htm#google_vignette
Diabetes
An estimated 10 to 12% of the world's population has diabetes, or about 800 million people have diabetes. Those who have the disease need to take care that Diabetes not to grow and those who do not have the disease to prevent it from happening. If you care yourself, try to stay stress-free. Don't avoid stress, but make up your mind to get out of it. Enjoy and take it. Keep a simple light diet. Eat sweet but eat in optimum quantity. Keep in mind that too much is forbidden everywhere. Exercise consistently every day.
Diabetes can occur due to hormonal imbalance in pancreas , thyroid , adrenal glands and pituitary glands. Hormonal changes with age can also affect blood sugar levels. How do hormones affect diabetes?
1. Insulin: The pancreas produces insulin, which helps move sugar from the blood to cells. In type 1 diabetes, the immune system attacks insulin-secreting cells in the pancreas. In type 2 diabetes, the body becomes resistant to insulin.
2. Sex hormones: An imbalance of sex hormones can affect type 2 diabetes. For example, hyperandrogegism in women and hypogonadism in men are risk factors.
3. Stress hormones: Adrenaline (epinephrine), cortisol, and growth hormone can all cause blood sugar levels to rise.
In other words, diabetes is a disease caused by hormonal imbalances and so to balance hormonal imbalances, one must have the right diet, regular exercise, control weight, so as to keep track of blood sugar levels. And most importantly, consult a specialist doctor in time and continue with the right treatment, without any random treatment, hearsay treatment, herbs.

Bar chart from University of Michigan showing effect of music on human body
Being in the world of music makes you happier and your stress hormone levels drop and your pain if any is definitely reduced. So listen to music.
What will you hear? Studies suggest that some Indian music chords may help reduce diabetes. Below are some of the songs. Listen to it or find the songs of the raga that you have searched for yourself on the internet. Share your experience. Let others benefit from it. And instead of thinking about any concerns, talk to a specialist doctor. Listen to some of the songs in Hindi/Marathi below.
While listening, take a deep breath, relax and listen to the songs quietly. Remember, music is a time-dedicating thing for treatment. So give yourself time to listen to music.
Listen to these songs from Raag Bageshree and Raag Shuddh Kalyan.
Rag Bageshree
Rag Shudh Kalyan
Some marathi songs and classical
Raag Bageshree
Raag Shuddh Kalyaan