Music and Health अर्थात संगीतस्वास्थ्य
मराठीत गीत रचना करताना व्याकरणातील नवरसांचा विचार केला जातो. शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, बीभत्स, अदभुत, शांत हे ते नवरस. त्यानुसार गीताला भक्तिगीत, प्रेमगीत, पोवाडा, भावगीत अस म्हटलं जायचं. मग याना "रस" हाच शब्द का वापरला गेला असेल? कारण गीताचे बोल बोलल्यानंतर तशी भावना शरीरात उद्यपित होते. उदाहरण द्यायच झाल तर एखादा पोवाडा म्हटला की स्फुरण चढते. शिवजयंती च्या वेळेस विविध ठिकाणी सजावटीसह लावलेले छत्रपती शिवरायांचे पोवाडे आपण ऐकतो तेव्हा जोष आपण अनुभवतो. हरिपाठ, अभंगासारखे भक्तीगीत ऐकले की देवाबद्दल भक्ती भावना निर्माण होते. एखादी लावणी ही शृंगार दर्शविते. हया विविध भावना आपल्या शरीरातील हार्मोन्स उद्यपित झाल्यामुळे घडते.
गीत रचनेबरोबर स्वर रचनेलाही तितकच महत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास खूप मोठा आहे. त्यात स्वरांचा सूक्ष्म विचार करून, नियम करून रागदारीची रचना केलेली आहे. याचाही हार्मोन्सवर निश्चित परिणाम होत असतो. जगभरात यावर संशोधन सुरू आहे.
आपल्या शरीरातील हार्मोन्स हे रासायनिक संदेशवाहक आहेत जे रक्ताद्वारे अवयव, स्नायू, त्वचा आणि इतर सेल्स मध्ये सिग्नल वाहून नेतात. ते आरोग्यासाठी आवश्यक आहेत. शरीराच्या चलनवलनावर या हार्मोन्सचा प्रभाव असतो.
पिट्यूटरी ग्रंथी, थायरॉईड ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी, स्वादुपिंड, अंडाशय आणि अंडकोष यासह शरीरातील विविध ग्रंथी आणि अवयवांमध्ये हार्मोन्स तयार होतात.
जेव्हा हार्मोन्स शरीराच्या एखाद्या भागाच्या पेशींवरील रिसेप्टर्सशी बांधले जातात तेव्हा त्या भागामध्ये ते सक्रिय होतात. हार्मोन्स एक चावी म्हणून कार्य करते आणि रिसेप्टर लॉकसारखे असते. जर हार्मोन्स रिसेप्टरमध्ये फिट बसत असेल तर ते पेशीमध्ये प्रतिसाद देऊ शकते. हार्मोन्स रक्ताद्वारे टार्गेट पेशींमध्ये प्रवास करतो. हार्मोन्स टार्गेट पेशीवरील रिसेप्टरला बांधतो.
रिसेप्टर हार्मोन्सच्या सूचना पार पाडतो, ज्यात पेशीची प्रथिने बदलणे किंवा जनुक चालू करणे समाविष्ट असू शकते.
संगीताचा शरीरावर चांगलाच परिणाम होत असतो. संगीत डोपामाइन, ऑक्सिटोसिन, एंडोर्फिन, कोर्टिसोल, एड्रेनोकॉर्टिकोट्रोपिक हार्मोनसह अनेक हार्मोन्स सक्रिय करू शकते. संगीत मेंदूवरही काम करते. मूड आणि भावनांमध्ये गुंतलेला मेंदूचा भाग अमिग्डाला थेट संगीतावर प्रक्रिया करतो.
संगीत डोपामाइनच्या मुक्ततेस चालना देऊ शकते, ज्यामुळे चिंता आणि नैराश्याच्या भावना दूर होण्यास मदत होते.
संगीत मेंदूच्या डोपामाइन संप्रेरकाच्या उत्पादनास चालना देऊ शकते. डोपामाइनचे हे वाढलेले उत्पादन चिंता आणि नैराश्याच्या भावना दूर करण्यास मदत करते. संगीतावर थेट अमिग्डालाद्वारे प्रक्रिया केली जाते, जो मूड आणि भावनांमध्ये गुंतलेला मेंदूचा भाग आहे. यामुळे ताण कमी होतो.
न्यूरोपेप्टाइड ऑक्सिटोसिन काही प्रमाणात संगीताच्या सामाजिक आणि आरोग्यफायद्यांसाठी जबाबदार असू शकते, तर एड्रेनोकॉर्टिकोट्रोपिक हार्मोन्स (एसीटीएच) संगीताच्या शरीरातील भावना आणि उत्तेजना प्रभावांमध्ये मध्यस्थी करू शकते.
संगीताचा वापर करून शरीर प्रकृती सुधारण्यास मदत होऊ शकते. योग्य वेळ, योग्य संगीत आणि योग्य श्वास घेण्याची पद्धत यामुळे हे शक्य होते. त्यामुळे रोगमुक्त होण्याचा दावा नसला तरी स्वास्थ्य आणि समाधान नक्कीच लाभते तसेच रोगमुक्तीसाठी लागणारा वेळ कमी होऊ शकतो. थोडक्यात Feel Good वाटायला लागते.
या पुढे शक्यतो प्रत्येक रविवारी मी या विषयी लिहिणार आहे. त्यात सुरवातीला काही आजार आणि संबंधित संगीत रागावर आधारित गाणी असतील. आपण त्या नुसार गाणी ऐकून आपला अभिप्राय कॉमेंट मधे नोंदवावा, ही विनंती.
While composing a song in Marathi, the navras of grammar are considered. It's beautiful, heroic, compassionate, rude, laughter, terrible, awful, wonderful, quiet. Accordingly, the song was called bhakti geet, love song, powada, bhavgeet. So why would it use the same word "ras"? Because after the lyrics of the song are spoken, such a feeling arises in the body. To give an example, when a powada is heard, the spark rises. Listening to devotional songs like Abhanga creates a feeling of devotion to God. It's all caused by the body's hormones being stimulated.
Along with song composition, vocal composition is equally important. The history of Indian classical music is very long. It is composed of ragadari by considering the nuances of the vowels, making rules. This, too, has a definite effect on hormones. Research is underway around the world.
Hormones are chemical messengers that carry signals through the blood to organs, muscles, skin, and other tissues. They are essential for life and health.
Hormones are produced in various glands and organs in the body, including the pituitary gland, thyroid gland, adrenal glands, pancreas, ovaries, and testes.
Hormones are activated in a body part when they bind to receptors on the cells of that part. The hormone acts as a key, and the receptor is like a lock. If the hormone fits the receptor, it can trigger a response in the cell. The hormone travels through the blood to the target cells. The hormone binds to the receptor on the target cell.
The receptor carries out the hormone's instructions, which can include changing the cell's proteins or turning on genes.
Music can activate several hormones, including Dopamine, Oxytocin, Endorphins, Cortisol, Adrenocorticotropic hormone. Music also works on brain. The amygdala, the part of the brain involved in mood and emotions, processes music directly.
Music can trigger the release of dopamine, which can help relieve feelings of anxiety and depression.
Music can boost the brain's production of the hormone dopamine. This increased dopamine production helps relieve feelings of anxiety and depression. Music is processed directly by the amygdala, which is the part of the brain involved in mood and emotions. It reduces stress.
The neuropeptide oxytocin may in part be responsible for the social and health benefits of music, while adrenocorticotropic hormone (ACTH) may mediate the engagement and arousal effects of music
Using music can help improve body health. This is made possible by the right time, the right music and the right breathing method. Therefore, although it does not claim to be free from disease, it certainly benefits health and satisfaction.
I will try to write about this every Sunday from now. It will initially contain songs based on some diseases and related musical ragas.
Nice
उत्तर द्याहटवाVery nice! Different raag in classical singing have different effect on moods of the person which may be surely affecting the harmone secretion as well as mentioned by you. Thanks for sharing.
उत्तर द्याहटवाThanks. I'm continuing to post on every Sunday with diseases and related useful ragas with some known Hindi / Marathi songs or instrumental music.
हटवा